देवा रे देवा!
देवा रे देवा
लक्ष द्याल केव्हा?
तुमचा भक्त करतो
आहे तुमची सेवा
आम्ही भक्त करतो
तुझ्या मंत्रांचा ध्यान
आता तरी लाभू द्या
आम्हा वरदान
'पियूष' करतो पूजा-पाठ
वाचतो धर्मग्रंथ
अवतार घ्या धरतीवरी
बनूनी या संत
लाभू द्या भक्तांना
तुमची छत्रछाया
जशी पक्ष्यांची माय देते
पाखरांना माया
कवी: पियूष टी. घरत व राजेश डी. हजारे (आमगाव जि . गोंदिया)
कवीचा परिचय:
पियुष ताराचंद घरत हा बालकवी असून अभिनव विद्या मंदिर रोंढा /सालेकसा येथे इयत्ता ७वी मध्ये शिक्षण घेत असताना शाळेतील शिक्षक राजेश डी . हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने सदर कविता लिहिली आहे. या कवितेशिवाय मराठी व हिंदी भाषेत अजून निवडक कविता त्याने लिहिलेल्या आहेत.
दिनांक: १५ नोव्हेंबर २०१९ / २७ एप्रिल २०२०
प्रथम प्रकाशन: गुरुवार ३० एप्रिल २०२० (पियुष टी . घरत च्या वाढदिवसानिमित्त)
सादरीकरण: अभिनव विद्या मंदिर रोंढा /सालेकसा (टॅलेंट हंट - द्वितीय विजेता: पियूष टी. घऱत)
© पियूष टी. घरत व राजेश डी. हजारे | सदर कवितेचे सर्वाधिकार कवींकडे सुरक्षित असून कवी/कवींच्या परवानगीशिवाय, कवी/कवींचे नाव बदलून किंवा निनावी हि कविता सादर, अग्रेषित व/वा प्रकाशित करता येणार नाही; दोन्ही कवींच्या नावासह सदर कविता जशीची तशी अग्रेषित व प्रसारित करण्यास हरकत नाही.