रक्षाबंधनानिमित्त...!!!
-लेखक: राजेश डी. हजारे 'आरडीएच'
मला बहिण नाही...
पण जिला मी मानतो;तिच्यापुढे सारे काही फिके आहे.
मात्र ती मला भाऊ मानत नाही.
आयुष्यात सगळे काही मिळू शकते,
पण बहिण नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही.
दु:ख, वेदना, तक्रारी या सगळ्यात
बहिणच खंबीरपणे पाठिशी उभी राहते.
बहिणीच्या प्रेमापुढे सगळे झुट आहे.
म्हणूनच मी म्हणतो,
तुम्हाला बहिण असेल
तर तिच्यावर प्रेम करा... तिचा मान राखा.
-©राजेश डी. हजारे 'आरडीएच'
जसं उन्हाळ्याच्या कडक ऊन्हात पादत्राणांशिवाय रेतीवर चालणं अवघड आहे; त्याहीपेक्षा... जीवनात ताईविणा जीवन जगणं असह्य (अवघड) आहे.
-©राजेश डी. हजारे 'आरडीएच'
कोंबड्याच्या आरवल्याशिवाय सकाळ व्यर्थ आहे;
सोनेरी प्रकाशाविणा सूर्य अपूर्ण आहे; तसंच...
भावाचं जीवन ताईविना अधूरं आहे.
भावाचं जीवन ताईविना अधूरं आहे.
-©राजेश डी. हजारे 'आरडीएच'
आकाशाला अंत नाही तसेच;
बहिण-भावाच्या नात्याला अंत नाही.
बहिण-भावाच्या नात्याला अंत नाही.
-©राजेश डी. हजारे 'आरडीएच'
कडू आठवणीत आठव मला
भावाची उणीव भासल्यास आठव मला
माझ्या वाट्याचे आनंद ठेव तूझ्याकडे
तुझे दु:ख असतील तर ते पाठव मला...
भावाची उणीव भासल्यास आठव मला
माझ्या वाट्याचे आनंद ठेव तूझ्याकडे
तुझे दु:ख असतील तर ते पाठव मला...
-©राजेश डी. हजारे 'आरडीएच'
ऐक ऐक गं ताई तू
तुला काय मी सांगतो
बहिणीच्या सुखासाठी
हा भाऊ अश्रू मांडतो
तुला काय मी सांगतो
बहिणीच्या सुखासाठी
हा भाऊ अश्रू मांडतो
-©राजेश डी. हजारे 'आरडीएच'
अंत्यंत नाजूक अशी ही वेळ आहे
बहिणभावात वैमनस्य निर्माण करण्याचा
कोणीतरी खेळतो खेळ आहे
चुकुनही होऊ द्यायचा नाही, आपापसात भेद
मग तो असो जनार्दन जसवंत जॉन किंवा जावेद
प्रत्येक हाताला बांधायची आहे राखी
कुणाचेही मनगट राहू नये बाकी
एकसूत्रात बांधा संपूर्ण भारत देश
रक्षाबंधनाचा ताई तूज हाच खरा संदेश
बहिणभावात वैमनस्य निर्माण करण्याचा
कोणीतरी खेळतो खेळ आहे
चुकुनही होऊ द्यायचा नाही, आपापसात भेद
मग तो असो जनार्दन जसवंत जॉन किंवा जावेद
प्रत्येक हाताला बांधायची आहे राखी
कुणाचेही मनगट राहू नये बाकी
एकसूत्रात बांधा संपूर्ण भारत देश
रक्षाबंधनाचा ताई तूज हाच खरा संदेश
-©राजेश डी. हजारे 'आरडीएच'
आजारीपणाशिवाय आरोग्याचे महत्त्व कळत नाही; तसेच
बहिण नसल्याशिवाय बहिणीचे महत्त्व कळत नाही.
-©राजेश डी. हजारे 'आरडीएच'
दोन दिवस वाट पाहण्यात गेले
दोन रडण्यात गेले
आजही मोजतो आहे
किती राहिलेत अश्रू माझ्या नयनी
माझी ताई तर माझ्या जीवनी
येऊन परतूनही गेली
मला काही कळलेच नाही
केव्हा हृदय तिच्यासाठी कासाविस झाले
दोन रडण्यात गेले
आजही मोजतो आहे
किती राहिलेत अश्रू माझ्या नयनी
माझी ताई तर माझ्या जीवनी
येऊन परतूनही गेली
मला काही कळलेच नाही
केव्हा हृदय तिच्यासाठी कासाविस झाले
-©राजेश डी. हजारे 'आरडीएच'
"रक्षाबंधनाचा पवित्र भाऊ-बहिणीचा सण साजरा करणे कदाचित आमच्यासारख्या विना सख्ख्या बहिणीच्या भावाच्या नशिबातच नसावा..!"
-©राजेश डी. हजारे 'आरडीएच'
बहन की किमत वो क्या जाने
जिसे कहियों बहने होते हैं।
बहन की किमत तो हम जैसो से पुछो
जो बहन पाने के लिये रात दिन रोते है॥
जिसे कहियों बहने होते हैं।
बहन की किमत तो हम जैसो से पुछो
जो बहन पाने के लिये रात दिन रोते है॥
-©राजेश डी. हजारे 'आरडीएच'
सच कहा था यह
मेरे दिल ने मुझे 'RDH'
ज़िंदगी न जी सके इंसान
अग़र उसे बहना न हो
मेरे दिल ने मुझे 'RDH'
ज़िंदगी न जी सके इंसान
अग़र उसे बहना न हो
-©राजेश डी. हजारे 'आरडीएच'
दिल गुमसूम जुबान खामोश
ये आँखे आज नम क्यूँ हैं?
ये 'राजू' तूने कभी बहन पाया ही नहीं
तो उससे जूदाई का ग़म क्यूँ हैं?
ये आँखे आज नम क्यूँ हैं?
ये 'राजू' तूने कभी बहन पाया ही नहीं
तो उससे जूदाई का ग़म क्यूँ हैं?
-©राजेश डी. हजारे 'आरडीएच'
If you have a sister
Treasure her with care
You won't miss her
Until you see her vaccant chair.
Treasure her with care
You won't miss her
Until you see her vaccant chair.
-©'Rajesh D. Hajare 'RDH'
एकच आहे बहिण मजला
उद्याही एकच राहील
विसरुनी तीला
कसा हा 'राजेश'
दुसरी ताई पाहील?
न होईल शक्य
जरी आलं तरी
मरण या भावाला...
उद्याही एकच राहील
विसरुनी तीला
कसा हा 'राजेश'
दुसरी ताई पाहील?
न होईल शक्य
जरी आलं तरी
मरण या भावाला...
-©राजेश डी. हजारे 'आरडीएच'
सदा गं जीवनी
तू हसती राहो
अल्लाह तुला
सदा सुखातच ठेवो
हिच प्रार्थना
ईश्वरचरणी देवाला...
तू हसती राहो
अल्लाह तुला
सदा सुखातच ठेवो
हिच प्रार्थना
ईश्वरचरणी देवाला...
पुर्या हो ताई
सर्व तुझ्या ईच्छा
रक्षाबंधनाच्या
तुला गं हार्दिक शुभेच्छा
भिडू दे ताई
नाव तूझं या गगनाला...
सर्व तुझ्या ईच्छा
रक्षाबंधनाच्या
तुला गं हार्दिक शुभेच्छा
भिडू दे ताई
नाव तूझं या गगनाला...
-©राजेश डी. हजारे 'आरडीएच'
Wishing you a very-very...
HAPPY~RAKSHABANDHAN..!!!
- स्त्रोत:
- #संदर्भ:- "माझी ताई : एक आठवण" या राजेश डी. हजारे 'आरडीएच' द्वारा लिखित आत्मकथनपर कादंबरी तून साभार
- #आंतरजाल (Internet) वर पूर्वप्रकाशित (02 ऑग. 2012 व ऑग. 2013)
- पुनःप्रसिद्ध: 27 ऑग. 2018 (संकेतस्थळ)