Monday 23 July 2018

विठ्ठलभक्ती/ Viththal Bhakti (कवी: RDHSir)

          ||विठ्ठलभक्ती||
कवी- ©राजेश डी. हजारे (आरडीएच)

हरी हरी हरी देवा हरी हरी
भक्त उभा देवा तुझिया दारी
कटेवरी कर पाय वीटेवरी
दर्शन दे तू गाभारी
भेद सारे भुलूनिया हा वारकरी
दुरून आला घेऊनी संतांची वारी
न्हाऊन घेती संत चंद्रभागेतीरी
आषाढ मासे संतमेळा पंढरपूरी
आनंदाने दंग होई दुनिया सारी
कष्ट विसरून गेला हा वारकरी
ओढ तुझ्या भक्तीची या भक्तांवरी
पाव देवा पाव हरी विठू पंढरी

कवी- ©राजेश डी. हजारे (आरडीएच) 
भ्रमणध्वणी क्र.: +९१-७५८८८८७४०१
आमगाव जि. गोंदिया
ईमेल- contact@rdhsir.com
संकेतस्थळ- www.rdhsir.com
रचना: ०२ ऑगष्ट २०१५