Tuesday, 25 February 2014

मी दिवाळीनंतर रामटेक मध्ये

दिवस 520 वा

अनुदिनी 97 वी

मनातल्या मनात- पत्र 4

राजूची रोजनिशी 1 (कादंबरी- पत्र 4)


सर्व वाचक मित्रांना,
खरंतर हा पत्र 1 महिन्यापुर्वी 23 जानेवारीलाच प्रसिद्धीसाठी मुद्रीत केला होता पण त्यादिवशी प्रसिद्ध करता आला नाही. तीन दिवसांनी 26 जानेवारी रोजी भारताचा प्रजासत्ताक आला. प्रजासत्ताक दिनाला मी मागील स्वातंत्र्य दिनी प्रसिद्ध '15 ऑगस्ट - 'नावाचा' राष्ट्रीय सण' या लेखाचा पुढील भाग 'SMS पाठवल्याने माणूस राष्ट्रप्रेमी होतो का???' हा 3 पृष्ठांचा लेख प्रसिद्ध केला व तो झालादेखील. या लेखाला वाचकांचा उत्सफूर्त प्रतिसाद सुद्धा मिळाला. कदाचित आपण सुद्धा तो लेख वाचला असेल! पण आठवडाभराच्या आत हा लेख आपोआपच Delete झाला. सदर लेख Recover करण्याचे सर्व प्रयत्न केले पण निष्फळ! Mywapblog.com चे CEO श्री अरविँद गुप्ता यांना हे कळवले असता त्यांनी हे अनपेक्षित घडल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करुन तो लेख रिकव्हर करण्याबाबत असमर्थता दर्शवली. खरंतर अशी समस्या (Blog प्रसिद्ध झाल्यानंतर आपोआप Delete होण्याची) प्रथमच घडल्याने मी ही अवाक् झालोच पण असो त्या लेखाचा माझ्याकडे कच्चा मसूदा लिहिलेला असल्याने बनवीन त्यालाच परत पण प्रसिद्ध मात्र करणार नाही इतक्यात.. आशा आहे आता पुढील लेखांबद्दल अशी समस्या निर्माण होणार नाही. आता आपण म्हणाल त्या लेखाचा व या पत्राचा काय संबंध? तर संबंध आहे. तो Delete झालेला लेख प्रसिद्धीनंतर Delete होण्यापुर्वी माझे 99 Blogposts पुर्ण झालेले होते व मी 100 वा विशेष ब्लॉग प्रसिद्धीसाठी या पत्राला थांबवून ठेवलं होतं.. पण 100 वा ब्लॉग लिहिण्यापुर्वीच तो 3 पानांचा संपुर्ण लेख Delete झाल्याने परत ब्लॉगपोस्ट ची संख्या 96 वर आली. आता हा पत्र 97 वा ब्लॉग म्हणून प्रसिद्ध करतोय. 100 वी ब्लॉगपोस्ट तर विशेषरित्या प्रसिद्ध करुयातच पण तत्पुर्वी अजून एक आनंदाची वार्ता- आजच 24 फेब्रूवारी 2014 रोजी 519 दिवसांच्या प्रवासानंतर 99 (सॉरी 96 बस्!) पोस्ट प्रसिद्धीनंतर आपल्या www.rdhsir.mwb.im या संकेतस्थळाला वाचकांच्या 1 लाख Visits पुर्ण झाल्या त्याबद्दल सर्व वाचकांचे अभिनंदन आणि भेट देणाऱ्यांना धन्यवाद! या निमित्त आणखी एक विशेष ब्लॉग प्रसिद्ध करीनच आज वा उद्या!
100%252C000 hits.png

मी दिवाळीनंतर रामटेक मध्ये

"मी 1 तारखेलाच रामटेक ला येणार होतो परंतु 2 तारखेला बसने दामू मामाजी सोबत आलो. बाबूजीँनी गोँदियापर्यँत सोडून दिले व तुमसर पर्यँत जाण्यासाठी मी गोँदिया - हिँगणघाट सुपर बसमध्ये बसलो वर सायकल होती. थोड्या अंतरावर गेल्यावर स्वत: Conductor नेच व प्रथमच मला Driver जवळ बसण्याची संधी दिली मी टाळाटाळ केली व नंतर ड्रायव्हर जवळ जाऊन बसलो व प्रथमच मी वरच्या सायकलची 'सामान'ची 8 रु. तिकीटे 20/- त घेतली. तुमसरहून रामटेकला आल्यानंतर स्वत: सायकल उतरवली तेव्हा सायकलचा समोरचा Mutguard Nut निघाला आणि पायी जाता-जाता आमगावमध्ये मागच्या Wheel चे 2 Puncture बनवूनही मागचा चाक Puncture झाला. Room वर गेल्यानंतर मी, मामाजी व निरज रुम बघण्यास गेलो.

रामटेकला टी पॉईँट कडे शीतलवाडीतच आम्हाला राऊतजी कडे Room भेटली व विचारपूस केल्यानंतर विशेषत: घरमालक चांगल्या स्वभावाचा भेटल्याने ती रुम केली. व नंतर मनिषाला* सामान पोहचवून दिला व रामटेकच्या गडमंदिराकडे दोघांचे 40/- देऊन आम्ही प्रस्थान केले व दर्शन घेतला. परंतू येताना Auto न भेटल्याने इतर 5 जणांसोबत आम्ही 2 असे 7 जण 8.45 ते 9.45 PM बरोबर 1 तासात Bus stop पोहचलो व पून्हा मनिषाच्या* Roomवर Match बघून ती संपल्यावर माझ्या जून्या Roomवर गेलो. तिथे जेवण करुन मामाजी जितेशच्या रुम मध्ये झोपले कारण तो गावी होता. व मी रात्री 12.56 मिनिटांनी सामान Pack करुन झोपलो. कालची विशेषता म्हणजे कालची 'टिपूर पौर्णिमा' होती व त्यानिमित्ताने रामटेक मध्ये जोरदार माहौल व सण उत्सवाचाच दिन आला होता. व कदाचित रामजीँना आमच्याकडून या पालखीचे दर्शन घेववून घ्यायचे असेल म्हणून आम्हाला पायी यावे लागले. व आम्हाला त्या भव्य पालखीचे दर्शन लाभले तेव्हाचा दृश्य खरंच Photo काढण्यालायक होता.

आज मी सकाळी 6.15Am ला उठून अंघोळ वगैरे करुन जेवण करुन मी Collegeला व मामाजी तिरोड्याला निघाले.
तत्पूर्वी आम्ही मामाजीसमवेत नवीन रुम वर सामान Shift केला.
मी आज College Attend करुन नवीन रुम व आलो व मामाजी 1.30वा. दूपारी इंदोऱ्याला पोहचल्याचे मला कळले.

मला इथे सर्वाँची आठवण येते. नवीन रुम वर निरजसारखे ओळखीचे मित्र ही नाही परंतू हळूहळू इथेही करमायला लागेल हीच अपेक्षा I miss my father, Mother, Aunty and my lovely Brother Good Night. Now time is 11.32PM."

राजेश

ता. क.- * - नाव बदलले आहे.
  • मुळ लेख- 03/11/2009 (रामटेक)
  • मुद्रण- 23/01/2014 (आमगाव)
  • प्रसिद्धी- 25/02/2014 (आमगाव)

अणुक्रमणिका

(कादंबरी/मनातल्या मनात)

No comments:

Post a Comment

Thank you so much for your comment on BookLysis by RDHSir.com! To avoid spam, your comment has been forwarded to the author for moderation purpose. If found all right, your comment will be approved soon!
Thank you so much!

Keep commenting..!

Don't forget to CHECK in NOTIFY ME.

Regards,

Rajesh D. Hajare (RDHSir)
Founder, BookLysis by RDHSir.com
www.rdhsir.com