दिवस 520 वा
अनुदिनी 97 वी
मनातल्या मनात- पत्र 4
राजूची रोजनिशी 1 (कादंबरी- पत्र 4)
सर्व वाचक मित्रांना,
मी दिवाळीनंतर रामटेक मध्ये
"मी 1 तारखेलाच रामटेक ला येणार होतो परंतु 2 तारखेला बसने दामू मामाजी सोबत आलो. बाबूजीँनी गोँदियापर्यँत सोडून दिले व तुमसर पर्यँत जाण्यासाठी मी गोँदिया - हिँगणघाट सुपर बसमध्ये बसलो वर सायकल होती. थोड्या अंतरावर गेल्यावर स्वत: Conductor नेच व प्रथमच मला Driver जवळ बसण्याची संधी दिली मी टाळाटाळ केली व नंतर ड्रायव्हर जवळ जाऊन बसलो व प्रथमच मी वरच्या सायकलची 'सामान'ची 8 रु. तिकीटे 20/- त घेतली. तुमसरहून रामटेकला आल्यानंतर स्वत: सायकल उतरवली तेव्हा सायकलचा समोरचा Mutguard Nut निघाला आणि पायी जाता-जाता आमगावमध्ये मागच्या Wheel चे 2 Puncture बनवूनही मागचा चाक Puncture झाला. Room वर गेल्यानंतर मी, मामाजी व निरज रुम बघण्यास गेलो.रामटेकला टी पॉईँट कडे शीतलवाडीतच आम्हाला राऊतजी कडे Room भेटली व विचारपूस केल्यानंतर विशेषत: घरमालक चांगल्या स्वभावाचा भेटल्याने ती रुम केली. व नंतर मनिषाला* सामान पोहचवून दिला व रामटेकच्या गडमंदिराकडे दोघांचे 40/- देऊन आम्ही प्रस्थान केले व दर्शन घेतला. परंतू येताना Auto न भेटल्याने इतर 5 जणांसोबत आम्ही 2 असे 7 जण 8.45 ते 9.45 PM बरोबर 1 तासात Bus stop पोहचलो व पून्हा मनिषाच्या* Roomवर Match बघून ती संपल्यावर माझ्या जून्या Roomवर गेलो. तिथे जेवण करुन मामाजी जितेशच्या रुम मध्ये झोपले कारण तो गावी होता. व मी रात्री 12.56 मिनिटांनी सामान Pack करुन झोपलो. कालची विशेषता म्हणजे कालची 'टिपूर पौर्णिमा' होती व त्यानिमित्ताने रामटेक मध्ये जोरदार माहौल व सण उत्सवाचाच दिन आला होता. व कदाचित रामजीँना आमच्याकडून या पालखीचे दर्शन घेववून घ्यायचे असेल म्हणून आम्हाला पायी यावे लागले. व आम्हाला त्या भव्य पालखीचे दर्शन लाभले तेव्हाचा दृश्य खरंच Photo काढण्यालायक होता.
आज मी सकाळी 6.15Am ला उठून अंघोळ वगैरे करुन जेवण करुन मी Collegeला व मामाजी तिरोड्याला निघाले.
तत्पूर्वी आम्ही मामाजीसमवेत नवीन रुम वर सामान Shift केला.
मी आज College Attend करुन नवीन रुम व आलो व मामाजी 1.30वा. दूपारी इंदोऱ्याला पोहचल्याचे मला कळले.
मला इथे सर्वाँची आठवण येते. नवीन रुम वर निरजसारखे ओळखीचे मित्र ही नाही परंतू हळूहळू इथेही करमायला लागेल हीच अपेक्षा I miss my father, Mother, Aunty and my lovely Brother Good Night. Now time is 11.32PM."
ता. क.- * - नाव बदलले आहे.
- मुळ लेख- 03/11/2009 (रामटेक)
- मुद्रण- 23/01/2014 (आमगाव)
- प्रसिद्धी- 25/02/2014 (आमगाव)