आजही सगळीकडे दिवे, पणत्या लागल्यात.. अंधारावर प्रकाशाचा अर्थात दुष्टावर सत्य व देवाचा विजय म्हणून दिवे लावतात वाटते.. सर्वीकडे रोषणाईच रोषणाई असते.. दिवाळीला लहाणांपासून तर मोठ्यांपर्यंत फटाके फोडतात.. मस्त आतिषबाजी होते..
रोहित शर्मानं तर परवाच फटाके फोडले बघ बॅटने विश्वविक्रमी 16 षटकार मारुन 209 धावा बनवत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात बंगळुरु मध्ये.. आणि भेट पण दिली आम्हा भारतीयांना सामना व मालिका विजयाची..
आम्ही पण फटाके फोडायचो लहानपणी.. पण आतासारखे विचित्र प्रकरण नव्हते.. आता नवनवे वेगवेगळे फटाके आहेत.. दिवाळीला फटाके फोडायला माझा विरोध नाही.. या सणाला नाही तर केव्हा फोडणार फटाके..? पण मर्यादा पाहीजेच ना कुठेतरी.. माझे बाबुजी नेहमी म्हणतात.. "प्रत्येक गोष्टीला मर्यादा असावी. एखादी गोष्ट मर्यादेबाहेर गेली कि त्याला उपाय नसतो.. आणि परिणाम घातकच असतात नेहमी." आणि हल्ली फटाक्यांमुळे किती प्रकारचे प्रदूषण होते नाही.. ध्वनी प्रदूषण, वायु प्रदुषण.. काही संस्था व समाजसेवक पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी इकोफ्रेँडली सण साजरे करण्याचा सल्ला देतात.. पण आम्हा सनातनी हिँदूंना वाटतं असं आमच्याच सणाच्या वेळी का? मी विरोध होतानाचे बरीच उदाहरणे जवळून बघितलीत.. तर मला वाटतं कि आपण असा विचार करण्यापेक्षा आपल्यापासूनच का सुरुवात करु नये इकोफ्रेँडली सण साजरा करण्यास.. ते चुकीचं तर नाही ना.. पर्यावरण सुरक्षा तर चांगलीच बाब आहे.. मग का 'पहल' करु नये आपल्यापासूनच.. म्हणून मी स्वत:बद्दल सांगू ईच्छितो कि मी तीन वर्षाँपासून रंगपंचमीला रंग उधळत नाही व हे तिसरे वर्ष आहे दिवाळीला फटाके फोडत नाही.. मी जाणतो कि माझ्या एकट्यामुळे काहि पर्यावरणाचे खुप मोठे रक्षण होणार नाही.. पण माझ्यामुळे जे प्रदुषण होणार होते ते मात्र मी नक्कीच टाळू शकतो.. यामुळे खुप काही साध्य होणार नसले तरी त्यातून मिळणारा आत्मिक समाधान आहे तो मी वर्णन करु शकत नाही.. आणि माझ्यामुळे प्रेरीत होऊन वर्षाला एक जरी व्यक्ती माझे अनुकरण करु लागला तरी माझ्यासाठी खुप आहे.. तर काय कराल साजरी फक्त एक वर्ष फटाकेमुक्त दिवाळी.."
"शेवटी दिपावली व नुतन वर्षाच्या आपण सर्वाँना हार्दीक शुभेच्छा..!!"
आणि हो साक्षात आज 8 जानेवारी 2014.. 2013 वर्षाच्या शेवटचा आठवड्यात 27 डिसेँबर जरा निराशाजनक गेला पण 29 डिसेँबर थोडा विशेष होता.. त्यादिवशी 'अनाथांची माई' म्हणून परिचित ज्येष्ठ समाजसेविका सौ. सिँधुताई सपकाळ यांच्याशी भेट जी झाली..
2013 ची अखेर जरा बरी झाली.. नविन वर्ष 2013ची सुरुवातही छान झाली... कालच सासवड जि. पुणे येथे 3,4 व 5 जानेवारीला भरलेल्या '87व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन-2014' च्या निमित्ताने पुणे येथून परतलो.. त्यासंदर्भात सविस्तर लिहिनच म्हणा.. तर पाठव पत्र परवा मग मला तु पण.. चल भेटु पुन्हा.. बाय..
डायरी लेखक- राजेश डी. हजारे (RDH)
मुळ लेख- 03/10/2009, रामटेकप्रथम प्रसिद्धी- 04/11/2013, फेसबुक
अद्ययावत लेखन- 03/01/2014 (शुक्रवार), MHADA/म्हाडा, सासवड जि. पुणे
पुनर्प्रसिद्धी- 08/01/2014 (मंगळवार), आमगाव
....तर खूप सुंदर वर्णन...मस्त विवेचन.. आणि समर्थन सुद्धा...
ReplyDeleteप्रदुषण कसे होवु नये या विषयीचे मत आवडले सर
ReplyDeleteखुप छान,परिणामकारक लेख.
ReplyDelete