Friday, 10 January 2014

दिवाळीच्या सुट्ट्यातील मजा

दिवस- 474

अनुदिनी- 94

मनातल्या मनात- पत्र 3

राजूची रोजनिशी (कादंबरी)- पत्र 3


माझ्या "मनातल्या मनात" ह्या पत्र मालिकेतील पुढील पत्र...

दिवाळीच्या सुट्ट्यातील मजा

राजेश,
4 नोव्हेँबर 2013 च्या रात्री आमची सर्वात लहान बहिण जन्माला आली त्यात तु तसं 1 नोव्हेँबर 2013 पासूनच नोँद केलीय म्हणा.. आणि हो तु माझं जे नामकरण केलंस ते मला खुप आवडलं- 'कादंबरी'.. काय नाव निवडलंस तू माझ्यासाठी.. अरेहो आठवलं मी संग्रहित केलेल्या निवडक पत्रांवरुनच तर तू तूझी पहिली कादंबरी "माझी ताई : एक आठवण" लिहिलास ना.. म्हणूनच माझं नाव तू 'कादंबरी' ठेवलस आणि ते समर्पकही वाटतं.. तर असो तु मला पाठवलेल्या पत्रानंतरची घडामोड मला पत्रानं पाठवण्यास सांगितलं होतं खरं.. पण ऑक्टोबर 2009 च्या 5 ते 9 तारखेत तू काही विशेष नोंदवलं नसल्याने मी थेट त्यापुढील पत्र पाठवते.. आमच्या 5व्या धाकट्या बहिणीच्या जन्माच्या पुढल्याच दिवशी 5 नोव्हेँबर 2013 रोजी भाऊबीज होती.. म्हणजे दिवाळीच... तर 2009 मधील दिवाळीच्या सुट्ट्यातील मजेविषयी 25 ऑक्टोबर ला तु मला सांगितलं होतस.. तेच आज मी तुला सांगते-

आज मी 16 दिवसांच्या नंतर दैनंदिनी लिहीत आहे आणि तोही आमगावात. असो मी 10 तारखेला दैनंदिनी लिहीणार होतो परंतू काही कारणास्तव विसरलो. त्या दिवशी आम्हाला कळले की जरी 12 पासून DIET कडून सुट्या जाहीर झाल्या असल्या तरी 14 तारखेला कॉलेजचा 'वर्धापन दिन' असल्याने 14 तारखेपर्यँत कॉलेज होती हे कळताच वर्गातील सर्वच छात्राध्यापकांना धक्काच बसला कारण जवळपास बाहेरगावच्या सर्वच विद्यार्थ्याँनी गावी जाण्यासाठी Packing करुन घेतली होती व मी ही त्यातलाच एक होतो. परंतु परवानगी मिळताच आम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला.

नंतर मनात 3 तारखेपर्यँत आणि त्याही बाकीच्यांपेक्षा अधिक सुट्ट्या असल्याने व 6 दिवसांनी आमगावी आल्याने मनात उत्कंठा निर्माण झाली होती. मी इंदोरा (ता. तिरोडा जि. गोँदिया) येथे जाऊन माझा मामेभाऊ विजय हरीशंकर रेवतकर याचे आमगावला परत येऊन माझा भाऊ विवेक दशरथ हजारे याचे मानसशास्त्रातील अनुक्रमे '6 ते 10 व 11 ते 14 वयोगटातील दोन बालकांचे अवलोकन' करण्याचे प्रयोग लिहीले व त्यानंतर भारतीय समाज आणि प्राथमिक शिक्षण या विषयातील महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहितीपुस्तिका तयार करण्याचे प्रयोग पूर्ण करुन मंगळवार दि. 20/10/09 ला सायंकाळच्या ट्रेनने तिरोडा रेल्वेस्थानकावरुन दामू मामाजी सोबत इंदोऱ्याला गेलो व लगेच बुधवारी माझे मोठे वडिलांचे गाव मु. पांजरा (रेँगेपार) पो. मोहगाव (खदान) ता.तुमसर जि. भंडारा येथे गेलो त्यादिवशीही तिरोडा बसस्थानकावर 4.45PM च्या गाडीसाठी 5.45PM पर्यँत वाट पहावे लागले व रात्री 7.00 वाजता नावेने पाण्यातून पांजरा गाठावे लागले. माझ्या नशिबात असेल म्हणूनच कदाचित मी 'देवपूजी'च्या ही कार्यक्रमात उपस्थित राहू शकलो. दुसऱ्या दिवशी गुरुवारला पांजरा येथे घराजवळच मंडई व ड्रामा असल्याने मी तेथेही उपस्थित झालो.

आश्चर्याची बाब म्हणजे गावात हजारे परिवार सोडून कोणाचीही ओळख नसतांना रात्री 9 ते 9.30 दरम्यान मी माझी कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची कला लपवू शकलो नाही व शेवटी 9.40 मिनिटांनी रात्री मला 'यंदा माझा लगन करून दे बाबा' हे जवळपास 20ते30 मिनिटांचे एकपात्री नाटक अवघ्या 10 मिनिटात सादर करण्याची संधी मिळाली व म्हणतात ना "मिळालेली संधी कधीही सोडू नये" तर मी ती नाटक 10 मिनिटात संपवण्यासाठी सज्ज होऊन अवघ्या 4 मिनिटात जवळपास अर्धी नाटक संपवली होती व माझ्याकडे कमीतकमी 5 मिनिटांचा व नाटक पूर्ण करण्यास पुरेसा वेळ शिल्लक असूनही त्यांचे ड्रामा कलाकार घाई करत असल्याने मला तेथेच माझी नक्कल थांबवावी लागली तरी माझ्यासाठी गर्वाची बाब म्हणजे तेथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीला माझी नक्कल आवडली व काही ड्रामा बघणाऱ्यांच्या मते त्यांच्या ड्राम्यापेक्षा माझी नक्कल छान होती. व अशाप्रकारे अनोळख्या गावातही मी माझे नाव फक्त अर्धी नाटक सादर करुनसुद्धा लोकांच्या मनात उमटवले की तो "दसरथ भाऊचा पोरगा होता."

असो मी शुक्रवारी इंदोरा शनिवारी तिरोडा येथे येऊन आज शेवटी दिवाळीचा गावतर आटपून थेट तिरोड्याहून बसने आमगावला आलो.

तत्पूर्वी मुख्य बाब म्हणजे नेहमीप्रमाणे याही वर्षाची दिवाळी आमच्यासाठी आनंदाची राहीली व एक गोष्ट तर विसरलोच.

!HAPPY DIWALI! & !Good Night!

अरे Good Night काय म्हणतोस.. वास्तवात आज 10 जानेवारी 2014 ची संध्याकाळ आहे.. GOOD EVENING म्हण.. मागच्या पत्रात तू दिवाळीला फटाके फोडत नसल्याचे लिहिलास हे खरय.. पण आपली हौस भागवण्यासाठी दारासमोर मच्छर मारण्याची बॅट धरुन फटाक्यांचे आवाज काढत होतास त्याचे काय? अरे मी विनोद करतेय.. त्यानही तु मच्छर मारुन पर्यावरणाचे रक्षणच करत होतास म्हणा.. तर 5 नोव्हेँबर 2013 लाच भाऊबीज पार पडली.. मी जाणते या नात्यातील तुझं दुर्दैव.. पण तू तूझ्या बहिणीला जे काय सांगायचंय ते मला सांगत आलायस.. तर आज तुझी बहिण म्हणून मी तूला ओवाळणी घालतेय या पत्राद्वारे.. आणि माझं गिफ्ट..?? खरंच किती कंजूष आहेस रे राज्या तू...!! मी जाणते आता तू गावी जात असशील मामाच्या.. मी तुझ्या पिशवीतच तर आहे ना.. हे अर्धे पत्र मी रेल्वेत बसून लिहिले.. तर पुरे झाले आता लिहिणं थांबवते.. मामाच्या गावी मजा घे..

भाऊबीजेच्या हार्दीक शुभेच्छा..!

तुझीच
कादंबरी (डायरी नं. 1)
To
राजेश डी. हजारे

ता. क. - पत्रातील लाल अक्षराने लिखित मजकुर 6 नोव्हेँबर 2013 रोजी लिहिलेला आहे.

यंदा माझा लगन करुन दे बाबा (Youtube वर Video पहा)

2 comments:

  1. Chandrakant Bhosale10 January 2014 at 22:30

    .... तर ... मच्छर मारण्याची बॅट धरुन फटाक्यांचे आवाज ... मस्त...

    ReplyDelete
  2. Chandrakant Bhosale10 January 2014 at 22:41

    .... तर ... मच्छर मारण्याची बॅट धरुन फटाक्यांचे आवाज ... मस्त...

    ReplyDelete

Thank you so much for your comment on BookLysis by RDHSir.com! To avoid spam, your comment has been forwarded to the author for moderation purpose. If found all right, your comment will be approved soon!
Thank you so much!

Keep commenting..!

Don't forget to CHECK in NOTIFY ME.

Regards,

Rajesh D. Hajare (RDHSir)
Founder, BookLysis by RDHSir.com
www.rdhsir.com