दिवस ==> 403 वा
अनुदिनी ==> 77 वी
सदर पत्र 'झाडीबोली'त पाठवत आहे...मृतात्म्यास पत्र
प्रतिमा स्त्रोत: India Today |
स्वर्गीय मेल्या माणसाच्या आत्म्यास,
मंग आखिरकार तूले बाहेर आणला.. आमी तं तसा तूले पायलून नवतून पर जे लोकं सकारी सकारी पायटलेच जातत ना (अगा डब्बे धरुन नायी गा...!) फिरावले का मनतत त्याले मार्निँग वाक का फार्निँग वाक तं त्यायच्यातल्या एकाले तूजे पाय दिसले होते खरा..! मंग पोलिसायले बोलवला असतील.. मनजे माले तं लागते सनवारच्या रातीच झाला असल तूजा काम तमाम है ना गा? तं पोलिसायना पोते हातरला जमिनीवर अना लोकायले मेन पोलिसाना सांगतलंन (माफ करा भाषेमुळे मान देऊ शकत नाही) "तर बघा तूम्हाला आतापर्यँत इथे थांबवून ठेवण्याचा इंटेन्शन एवढाच आहे कि जर तुमच्यातील कोणी याला ओळखत असेल कि हा कोण आहे, कूठला आहे तर सांगावं व याची ओळख पटावी... तर तुम्ही एक-एक करुन पुढे या, पहा व समोर निघत चला..." त्याच्यापयलेच आमाले फोटोग्राफर ना क्यामेऱ्यात तूही फोटू दाखवलन होतन.. तेबी अलग-अलग पोज मंदली.. तूना बी खिचला नससील तस्या पोज जिता अससील तई..! तरी आमी तूले ससारचा (खरोखर) पावासाटी थांबलेच होतून.. मंग आमी पायलून तूले.. नड्ड्यावर (गळा), पाटीवर ना पोटावर चाकूचे घाव होते, तोँड उघडा होता.. मोठा भयानक दिसत होतास पर आमाले भेव नायी लागला.. मंग कोणातरी ओरखलन ना तूजा असली सरनेम सांगतलन तो मी नाई लिवा या पतरात अना गाव सांगतलन.. अखीन एका मानसाना पुस्टी केलन (पेपर वाचता मून मी बी नक्कल मारुन रायलू पेपरावानी.. ) तं पुस्टी बी नायी समजे; पुस्टी मनजे तो तुच व्हस मून कनफरम गा.. मंग आमी घरी आलून.. त्याच्या बादमंदी पोलिसायना तूजा पोस्टमार्टम केला असतील नायी का..? अना मंग तूले तूया घरी नेऊन सोडला असतील..
पर हो.. जर भूत झालास गिलास तं एकदम माझ्याजवरच नोको येजो नायतं माले पतरं कायले लिवलास मून.. अना तू झोँबजो तं त्यायले ज्यायनं तूले मारला.. आता मालूम चालला का तू मोटा सिदा सादा होतास खरा..
तं मी हा पतरं तूले सांगावसाठी लिवून रायलू का माणूस मेल्यावर त्याचा का होते हा अलग मॅटर आहे पर त्याच्याबाऱ्यात त्याच्या संगचेच आमच्यासारके लोकं का सोचतत.. अना हा मालूम असून का एक दिवस सप्पायले जावाचाच आहे तरी!! तं जाऊ दे तो सब सोड आता.. मी सांगता त्या घराले आता दरवाजा लावला.. तूले एकच इनती हाय का जो झाला तो झाला.. बळा गलत झाला तूज्यासंगा पर जाऊ दे आता त्यायची सजा देव त्याले देयल पर तू आता देवाघरी गेलास तं देव बनून राय.. भूत बीत तं रायेच नायी.. हाच सांगावासाठी डॉ. नरेँद्र दाभोळकर सारखा देवमाणूस थकून केला पर हिँमत नायी हारला तं जनावरायना त्यायच्यासारक्या देवमाणसाले बी तूज्याचसारखा मारला.. तूले मालूमच असल पेपरात वाचला अससील तं.. ते आता तेतीच असतील.. तू त्यायले विचार डॉक्टर तूले माज्यावून चांगला समजवून सांगतील भूत-चुडैल च्या बाऱ्यात का हे निर्री अंदश्रद्दा व्हय मून.. अना हो चूकभूल माफ कर.. जेतीबी अससील सुखी राय..
-राजेश डी. हजारे
(लेखक 'अ.भा.मराठी साहित्य परिषद, पुणे' चे 'गोँदिया जिल्हाध्यक्ष' आहेत.)आमगाव जि. गोँदिया
लेखन: 20 ऑक्टो. 2013 (रविवार)
शेवटचे अद्ययावत: 19 मे 2019 (रविवार)