ब्लॉग- 64 वा
दिवस- 365 वा
प्रिय ताई,पत्राची सुरुवात कशी करावी ते ही कळत नाहिये.. याचा अर्थ मला पत्र लिहीता येत नाही असा नाही गं.. माझ्या दैनंदिनी वह्या उघडून बघितल्यास तुला पण प्रचिती येईल त्याची.. बरीच पत्रे लिहिलीत व आताही लिहितोय तुला माझ्या दैनंदिनीत आणि कालांतराने वाचत बसतो एकटाच... तुझ्याशी बोलू शकत नाही ना म्हणून.. पण यावेळी मनात जरा भितीच आहे बघ कारण पहिल्यांदाच मी प्रसिद्ध करतोय ना तुला पाठवत असलेला पत्र यावेळी... "माझी ताई:एक आठवण" ही तुझ्यावर लिहिलेली कादंबरी (जणू पत्रमालिकाच) पण प्रसिद्ध करणार होतो मी 'न लिहिलेली पत्रे' मध्ये पण नाही पाठवू शकत ते काही कारणांनी तेथे.. आणि हा पत्र म्हणजे काही त्या पुस्तकातील भाग नाहीच...
मला माहितीये ताई तु इंटरनेट वापरत नाही ते.. पण कोण जाणे हृदयाच्या एखाद्या कोप-यातून तू पण हे दुर्दैवी भावाचं पत्र वाचत असशील...!! ताई वाचतीयेस ना..???
काल 22 सप्टेँबर 2013.. अगं 22 सप्टेँबर.. काही आठवतंय? तुला कशाला आठवणार.. पण मला आठवतंय.. काल 2 वर्ष पूरी झाली त्या आपल्या अविस्मरणीय संवादाला.. जेव्हा 2011 च्या 21 सप्टेँबर रोजी डिटीएड द्वितीय वर्षाची वार्षिक परिक्षा संपल्यानंतर दुस-याच दिवशी 601 दिवसांचा मौन सोडून माझी ताई माझ्याशी प्रथमच बोलली होती.. आता काही आठवलं? होय ताई मी 22 सप्टेंबर 2011 च्याच त्या जेमतेम 1 तासाच्या अविस्मरणीय संवादाबद्दल लिहीतोय.. मागल्या वर्षी या दिवसाची आठवण म्हणूनच मी माझा पहिला ब्लॉग लिहिला होता.. योगायोगाने आज माझ्या ब्लॉग चा पण पहिला वाढदिवस साजरा होतोय या पत्रासह... आणि आता या पत्राद्वारे मी त्या सुखद आठवणींनाच उजाळा देतोय...
तू बोलावल्याप्रमाणेच मी कादंबरी घेऊन तुझ्या रुमवर आलो व तुझ्या दर्शनासाठी आसूसलेला मी तु दिसताच माघारी फिरलो... रुमवर प्रवेशानंतर ताई मी चक्क 601 दिवसांनंतर आपलं बोलणं होणार असल्याने आणि तू स्वत: बोलावल्याने आनंदी जितका होतो तितकाच तू काय बोलशील या विचाराने मनातून घाबरलेलाही होतो... मला त्या भेटीचं क्षण न् क्षण व एकेक प्रसंग जसाचा तसा आठवतोय आजही..! काश् मी चित्रकार असतो तर तो चित्र अगदी तसाच रंगवला असता पण ईश्वरानं माझ्याऐवजी माझ्या लहान भावाला चित्रकला व अल्लाहनं मला लेखनकला दिली... काय झालं मी चित्रकार नसलो तरी स्वत:च्या लेखनीने कुठलीही अतीशयोक्ती न करता ते चित्र रेखाटू शकतो... तुझ्या मैत्रिणीँचा अवघा गृप माझ्या भोवती जमला होता.. आणि मी मुलगा असून तुम्हा 6-7 मुलीँमध्ये मुलीसारखा लाजत होतो...
तु एकदम आलीस आणि केला प्रश्न मला "सांगा काय आहे तुमची शेवटची ईच्छा..?" तीन-चार दा तू प्रश्न केल्यावर मी तोँड उघडला.. माझीच चुक होती.. मी तसं लिहायला नको होतं..! मला माफ कर.. ताई तू त्या दिवशी मला बरेच प्रश्न केलेत आणि मी काही प्रश्नांची उत्तरे दिलीत पण.. मला वाटतं तु समाधानी असशील.. पण राहूनच गेले तुझे काही प्रश्न माझ्या उत्तरांविणाच.. काय करणार गं ताई मी पण.. कित्ती दिवसांच्या अबोल्यानंतर तु माझ्याशी बोलत होतीस... ती ही स्वत:हून.. मला बोलायचं तर भरपूर होतं गं ताई त्या दिवशी तुझ्याशी.. 2 वर्षाँपासून वाट जो पाहत होतो त्या दिवसाची.. पण आतून शब्दच फूटत नव्हते.. मन अगदी गदगद झालं होतं बघ.. महिनाभराच्या उपाशी बोक्यापुढे एकदम पंचपक्वान्नाचं ताट आलं बिलं तर मग कसं होतं; अगदी तसंच झालं होतं माझं..! मी तुझ्यासाठी मैत्रिणीँमार्फत चॉक्लेट पाठवायचो त्याला तु विनोदाने 'रिश्वत' ची उपमा दिलीस.. पण कोण भाऊ बहिणीला रिश्वत देईल गं??
ताई मला माहित नव्हतं कि माझ्या भावना व्यक्त करणं तुला आवडत नव्हतं ते.. पण मी तुला राग यावा म्हणून नव्हे गं ताई तर तुझे गैरसमज दुर होऊन सत्यता कळावी म्हणून मी वेगवेगळे नवनवे मार्ग शोधत होतो पण तुला कधी त्रास द्यावा असा विचार पण मनात आला नाही.. आणि भविष्यात सुद्धा माझ्याद्वारे मी असं कोणतंही कृत्य होऊ देणार नाही ज्यामुळे माझ्या बहिणीला मी तीला बहिण माणल्याचं शल्य होईल... तुला आठवते माझी सही? आता पण मी तशीच सही करतो; फरक फक्त इतकाच आहे कि आता त्यातला 'ताई' हा शब्द स्पष्ट दिसू देत नाही तरी ओळखतातच लोकं! होय 'माझं जीवन आणि माझी ताई' आता एक समिकरणच' झालंय..
ताई तु मला "माझी ताई:एक आठवण" पुस्तकरुपात प्रकाशित न करण्याची विनंती केलीस आणि मी दिलंही वचन क्षणाचा विलंब न करता.. ताइ विश्वास ठेव नाही मोडणार मी ते वचन.. अगं ज्या बहिणीच्या एका अप्रत्यक्ष ईच्छेनुसार मी बोलणं थांबवलं.. स्वत: रडत ज्या बहिणीसाठी कादंबरी लिहिली ती प्रकाशित करुन त्याच बहिणीला त्रास देईल का? किमान इतका विश्वास तर मी कमावलाच असेन तुझ्या नजरेत त्या 2 वर्षात..! माझी ईच्छा होती ती पुस्तक तु वाचावीस ते तु वाचलं खरं.. त्यानंतर त्यात मी फक्त एकच लेख वाढवला तो ही याच संस्मरणीय भेटीवर "जाता-जाता गोड शेवट..." पण हो ताई मी माझ्या त्या साहित्यकृतीचा अपमान नाही करु शकत ती पुस्तक अप्रकाशित ठेवून.. पण तरीही मी तुला दिलेल्या शब्दाला तडा जावू देणार नाही हा विश्वास ठेव... मी सर्व कादंबरीचे स्वरुप पालटून फक्त त्या कथेचा आशय एका वेगळ्या स्वरुपात वेगळ्या शिर्षकासह माझ्या वाचकांसाठी प्रकाशित करीन... जेणेकरुन सर्वप्रथम तुला दिलेला वचनही पाळला जाईल व मला कवीचे लेखक बनवणारी त्या पुस्तकाची सत्यकथा ही जीवंत राहील माझ्या वाचकांसाठी
हाच ब्लॉग पुढे वाचा-->
khup chhan lekhan aahe rajesh.
ReplyDeleteNice blog )
ReplyDeletehttp://4x74wzqe.com my blog