Pages

Saturday, 27 July 2013

मुंबई लोकलचा पहिला प्रवास

अनुदिनी क्रमांक (Blog)→ 55

दिवस→ 307 वा

3 जुलै रोजी गोँदिया हून मुंबई साठी 'विदर्भ सुपरफास्ट एक्सप्रेस'च्या (12106) आरक्षित 'एस 2' कोच मधून 16 ते 17 तासाचा प्रवास केल्यानंतर आम्ही सर्व (तिघे मित्र) 'सीएसटी' च्या एक स्थानकापूर्वी 4 जुलै रोजी सकाळी सात-साडेसात दरम्यान दादर रेल्वे स्थानकावर उतरलो. 7519800054_b367021644_z.jpgMumbailocaltrain.jpg सहप्रवासी मो. ज़ाहीद खान भाई मालाडला जाणार असल्याने त्यांच्यासहच आम्ही पश्चिम मार्गाने बोरीलली साठी 'मुंबई लोकल' पकडली.

'मुंबई लोकल'बद्दल बरंच काही ऐकलं होतं ... मनात धास्ती होती.. सकाळी-सकाळी कल्याण-ठाणे दरम्यान 'विदर्भ एक्सप्रेस'मधून पावसाळ्याच्या बोच-या थंडीत प्रवेशद्वारा (गेट) लटकलेले प्रवासी घेऊन जात असलेल्या 'मुंबई लोकल'चे दर्शन होताच आजवर ऐकलेलं सर्व काही खरं असल्याची खात्री पटली ... मनात धास्ती असली तरी असं ना तसं लोकलचा प्रवास करणं भागच असल्याने थोडं आकर्षण व कुतूहल पण वाटू लागलं ... आम्ही बसलेल्या लोकलमध्ये तशी फारशी गर्दी नव्हतीच..! ज़ाहीद भाई सोबतीला असल्याने लोकल पकडण्यास (प्लॅटफॉर्म, तिकीटघर, रेल्वेलाईन इ. ची माहिती मिळवण्यास) बरीच प्राथमिक मदत झाली.. ज्या गाडीत प्रवाश्यांना पाय ठेवायला जागा नसते व गेटला लटकावं लागतं त्याच मुंबई लोकलमध्ये बसण्यास देखील जागा होती... पण ती लोकल अंधेरी इथं थांबली ती शेवटचे स्थानक म्हणूनच..! आम्ही चुकून त्या गाडीत बसलो होतो..! पण आम्हाला जायचं असलेलं बोरीवली स्थानक त्याच मार्गावर असल्याने घाबरण्याचं काही कारण नव्हतं... पुढील प्लॅटफॉर्म वरुन दुसरी गाडी पकडली... इथेही मागील गाडीहून अधिक गर्दी असली तरी फारशी नव्हतीच... जाहीद भाई मालाड स्थानकावर उतरले... आम्ही 2 स्थानक पुढे बोरीवली ला उतरलो... नंतर मुंबई लोकलने अजून एकदा प्रवास करण्याचा योग आला तो त्याच दिवशी सायंकाळी सांताक्रूझ - चर्चगेट स्थानकापर्यंत...

'मुंबई लोकल' ट्रेन मधील आमच्या सारख्या बाह्यमुंबई (क्षेत्रातील) लोकलने प्रवास करणा-यांसाठी कुतूहलाची बाब म्हणजे --- मुंबई लोकल मधील अनाऊंसमेँट .. पुढचं स्थानक कूणाला विचारण्याची कधी गरजच पडत नाही... आपण शहरातील लोकलने नव्याने जरी प्रवास करत असलो तरी त्या गाडीत लावलेल्या ध्वनीक्षेपकाच्या (स्पीकर) आवाजातूनच आपणास पुढचं स्थानक कळतं... शिवाय मुंबई लोकलमधील प्रवाश्यांची शिस्त (जाणिवपूर्वक म्हणा व टीटीई च्या भितीने)...! कारण मुंबई लोकलमधील आरक्षित डब्यात सर्वसाधारण प्रवाश्यांना आपल्या प्रवासापुरतं देखील अतीक्रमण करता (बसता) येत नाही... किँबहूना आरक्षित डब्यात चढताच येत नाही... लोकलमध्ये देखील प्रथम दर्जा, महिला व विकलांगांसाठी आरक्षित डबे असतात... हे काही आपल्यासारख्या बाह्यमुंबईकर प्रवाश्यांसाठी नवीन नसले तरी मुंबई लोकलच्या प्रवाशांमार्फत तिथले नियम पाळले जातात हे खरंच आपणासारख्यांनी शिकण्यासारखे वाटते... तर मित्रांनो असा आहे माझा 'मुंबई लोकल'मधील अनूभव व काहिही म्हणा पण स्मरणातील माझा 'मुंबई लोकलचा पहिला प्रवास'..!



rdhautographmar.jpgराजेश डी. हजारे

4 जुलै 2013, मुंबई

18 जुलै 2013, आमगाव

No comments:

Post a Comment

Thank you so much for your comment on BookLysis by RDHSir.com! To avoid spam, your comment has been forwarded to the author for moderation purpose. If found all right, your comment will be approved soon!
Thank you so much!

Keep commenting..!

Don't forget to CHECK in NOTIFY ME.

Regards,

Rajesh D. Hajare (RDHSir)
Founder, BookLysis by RDHSir.com
www.rdhsir.com