Saturday, 13 April 2013

माहितीपत्रक व अनुदान अर्ज

49th → BLOG POST
102nd → DAY

सुप्रभात मित्रांनो ..!

मागे मला एक भ्रमणध्वणी आला; तसं पाहता तो अनपेक्षितच होता... आणि आजपर्यँत एकही पुस्तक प्रकाशित न झालेल्या लेखकाचा गौरवदेखील ...!

भ्रमणध्वनी 'महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई' येथून आलेला होता... माझ्या हस्तलिखीत साहित्यांविषयी विचारपूस केली गेली... मी भ्रमणध्वनी वरच संक्षिप्त माहिती दिली...

'महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई' येथून नवलेखकाच्या पहिल्या पुस्तक प्रकाशनासाठी मिळत असलेल्या अनुदानासंबंधी माहिती दिड वर्षाँपूर्वीच झाडीपट्टीचे सर्वेसर्वा व अ.भा.बोलीभाषा मंडळाचे अध्यक्ष मा. श्री हरीश्चंद्र बोरकर यांनी दिलेली होती पण मीच दुर्लक्ष केला...

सन 2013-14 या वर्षात मंडळातर्फे नवलेखकाच्या पहिल्या पुस्तक प्रकाशनासाठी देण्यात येणा-या अनुदानासंबंधी सदर फोन होता... त्याचदिवशी फोन येण्यापूर्वी यासंबंधी मला माहितीही होती...

मी म.रा.सा.सं.मं मुंबई च्या संकेतस्थळाला भेट दिली पुर्ण माहितीचा आढावा घेतला पण सदर माहितीपत्रक व अनुदान अर्ज कुठेच आढळले नाही. (कदाचित मी भ्रमणध्वनीयंत्राहून संकेतस्थळावर संचार करत असल्याने), मग मी स्वत:हून काल मंडळाशी यासंबंधी भ्रमणध्वनीयंत्राद्वारे संपर्क साधला असता त्यांनी माझ्या ई-संदेश पत्त्यावर (Email) सदर माहितीपत्रक व अनुदान अर्ज पाठवला असता आंतरजाल केंद्रावर जाऊन मी प्राप्त 5 ही पानांचे परिपत्रकाची छापील प्रत हस्तगत केली...

यावर्षी जेमतेम मी माझ्या कोणत्याही एका प्रकारचे हस्तलिखित पुस्तक पाठवणार होतो पण→ माझ्या दर्जेदार मराठी कवितांची संख्या सध्या फक्त 41 असल्यामुळे, मी एक वर्ष अजून प्रतिक्षा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण इतर साहित्यप्रकार परत लिहिण्यास माझ्याकडे वेळ नाही... माझ्या पदवीच्या द्वितीय वर्षाच्या वार्षिक परिक्षा अगदी जवळ येऊन ठेपलेल्या आहेत...

पुढील वर्षी मी कोणतेही एक पुस्तक मंडळाला पाठवणार असलो तरी माझं आत्मकथनपर पुस्तक 'माझी ताई : एक आठवण' आहे त्या अथवा रुपांतरित स्वरुपात पाठवणार नाही कारण पुस्तकाचा दर्जा मला वेगळा सांगण्याची गरज नाही तो माझे वाचकवर्ग सांगतीलच पण ते फार मोठे पुस्तक असल्यामुळे नियमांमध्ये बसत नाही, आणि आहे त्या स्वरूपात अथवा त्या शिर्षकासह मी ते पुस्तक प्रकाशित करणार नसल्याचे आपण जाणताच...

तरी आता किमान अजून एक वर्ष आपणास माझ्या प्रकाशित पुस्तकाची प्रत वाचण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार!! मात्र बहुतेक साहित्य माझ्या www.rdhsir.mwb.im या संकेतस्थळावर माझ्या नावे वैधानिक पातळीवर नामवर्धित असून आपण सर्व ते वाचण्यासाठी इथे Click करा.

धन्यवाद ..!

आपला

राजेश डी. हजारे (RDHSir)
(गोँदिया जिल्हाध्यक्ष-अ. भा.मराठी साहित्य परिषद, पुणे)
आमगाव जि. गोँदिया
दि. 13 एप्रिल 2013 (शनिवार)

3 comments:

  1. Sir Mai jo bhi Post apne blog me likhta hu aur 10 space dene ke bavajud Wo chhepak ke ate hai Ap kaise Post likhte Hai uska example replay me Dijeye

    ReplyDelete
  2. Rajesh D Hajare RDH25 April 2013 at 10:48

    @Vaibhav Bhagat,
    niche likhne ke liye [align=left/center/left]Content[/align]
    Paragraph ke liye
    content

    ReplyDelete
  3. Deep thought! Thanks for conrtibtuing.

    ReplyDelete

Thank you so much for your comment on BookLysis by RDHSir.com! To avoid spam, your comment has been forwarded to the author for moderation purpose. If found all right, your comment will be approved soon!
Thank you so much!

Keep commenting..!

Don't forget to CHECK in NOTIFY ME.

Regards,

Rajesh D. Hajare (RDHSir)
Founder, BookLysis by RDHSir.com
www.rdhsir.com