आज १४ फेब्रूवारी. १४ फेब्रूवारी- व्हॅलेँटाईन डे अर्थात प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. तसं पाहिलं तर हा पाश्चिमात्य सण. पण अशी कोणती पाश्चिमात्य गोष्ट आहे जीचा आपण भारतीयांनी स्विकार केला नाही? तसं पाहता प्रेम व्यक्त करण्यासाठी स्वतंत्र एखादा दिवस असण्याची आवश्यकता नाही. पण हरकत नाही; असायला हवा असाही एक दिवस राखीव 'प्रेम दिवस' म्हणून...!
प्रेम! "पवित्र अडीच अक्षरांचा संगम म्हणजे प्रेम." पण आज प्रेम शब्द कानावर येताच अथवा ओठांतून निघताच नयनचक्षूंसमोर भ्रमण करतात दोन परलिँगी पाखरू---> तरुण-तरुणी आणि अल्पवयीन मुले-मूलीही...! आज प्रेम हा पवित्र शब्द अपवित्रच होताना जास्त दिसत आहे आणि रोजच्या वर्तमानपत्र व वृत्तवाहिन्यांवरील प्रेमविषयक गुन्हेगारीवरून सिद्धही!
"प्रेम हा खरं तर सृष्टीचक्राच्या नियंत्रणाचा एकमेव आधार. प्रेमाविना क्षणभराचा मोकळा श्वासही शक्य नाही." मला माझे मित्र प्रेमविरोधी म्हणूनही ओळखत असतील... पण माझं प्रेमविरोधी बनण्यामागचं कारण व पार्श्वभूमीही तशीच आहे. आणि खरं म्हणजे मी प्रेमविरोधी नाहीच. माझा 'प्रेम' या शब्दाला विरोध नाहीच मुळी..! पवित्र प्रेमाला तो ईश्वरही विरोध करत नाही तेव्हा मी कोण तो विरोध करणार? मी विरोध करतो आजच्या तरुण-तरुणीँच्या अविचारी प्रेमाला.
मला विचारावसं वाटतं कि काय प्रेम हे फक्त प्रियकर-प्रेयसीचच असतं? तर नाही. प्रेम म्हटले म्हणजे आई-बाळांचे, पक्षी-पिल्ल्यांचे, गाय-वासरूचे, मित्र-मैत्रिणीँचे, प्रियकर-प्रेयसीचे व भाऊ-बहिणीचे सुद्धा असते. माझा विरोध प्रियकर-प्रेयसीच्या पवित्र प्रेमालाही नाही पण अशा पवित्र प्रेम करणाऱ्या जोडप्यांची शेकडेवारी काढल्यास हातापायाची 20 बोटेही जास्त ठरावीत! आणि हिच बाब चिँताजनक आहे.
आज प्रेम हा शब्द काळजी व भावनिकतेचा राहिलेला नसून फक्त शरीरसुखासाठी उपभोगाचा बनून उरलेला आहे. प्रत्येक जण प्रेमाचा स्वत:च्या ईच्छेनुसार वापर करू लागला आहे... बदलत्या काळानुसार प्रेमाच्या व्याख्याही आता बदललेल्या आहेत. "आजची पिढी प्रेम या संज्ञेच्या नावाखाली वासनेच्या आहारी फरफडत चालली आहे." सदर लेखातून माझा उद्देश प्रियकर, प्रेयसी, प्रेम वा व्हॅलेँटाईन डे चा विरोध करण्याचा मुळीच नाही; परंतु आजचे अवसे-नवसे-गवसे-हौसे प्रेमवेडे माझ्यापुढे लैला-मजनू, हिर-रांझा, सलीम-अनारकली, देवदास-पारो व रोमिओ अॅँड ज्युलिएट यांच्या इतिहासजमा पवित्र प्रेमाची उदाहरणे देतील मी जाणतो परंतु ते प्रेम आता शिल्लक राहिलेले नाही व भविष्यात पुनरावृत्ती होणेही शक्य नाही. कारण तशी सहनशीलता आजच्या युवकांमध्ये उरलेली नाही. आणि ज्यांनी प्रेमाचे निर्मळ नीराप्रमाणे पावित्र्य जपलेले आहे त्यांना माझ्या विचारांचा विरोध करण्याचा वा आक्षेप घेण्याचे कारण नाही; उलट त्यांना सदर लेखातील सत्यता व वास्तविकता कळेलच.
आज प्रियकर + प्रेयसी = प्रेम (LOVE) = वासना (Lust) आणि या वासनायुक्त प्रेमातूनच पुढे घडतात शरीरसंबंध (Physical Relations / SEX) आणि यास जर नकार पुढे आला अथवा नंतर 'दगा' दिला तर मग--- 'बला***' (R***) आणि हत्या..! आणि इतकं सगळं होत असताना जर मग लोक LOVE=SEX हे समिकरण तयार करत असतील तर त्यांचं तरी कूठे चूकतय? आज बहूतांश (मोजके अपवाद सोडून) प्रियकर-प्रेयसींनीच हे समिकरण तयार करण्यास भाग पाडलंय व हे समिकरण सिद्धही केलय..!
हे झाले आजच्या प्रेमविषयक माझे विचार... असो...!
आज 14 फेब्रुवारी म्हणजे 'व्हॅलेँटाईन डे'. माझा विरोध हा दिवस साजरा करण्यास नाहीच मुळी..! 14 फेब्रुवारी हा रोम आणि तर्नी या दोन देशात प्रेमाचा संदेश देणा-या 'व्हॅलेँटाईन' नावाच्या दोन भिन्न संताचा भिन्न काळातील शहीददिवस. जो जगभर त्यांच्याच नावाने त्यांचाच प्रेमाचा संदेश देऊन (प्रेम व्यक्त करून) पाळला जातो. आजच्या दिवशी आपण कुणासही 'व्हॅलेँटाईन' दिनाच्या शुभेच्छा देऊ शकतो. अगदी आई-बाबा, मित्र-मैत्रिणी, भाऊ-बहिण, विद्यार्थी-शिक्षक, सहकर्मचारी, शेजारी आणि प्रियकर-प्रेयसी तर आहेतच..! कुणी म्हणजे कूणीही! असा प्रत्येक जण ज्यांच्यावर आपण प्रेम करतो. होय..! आपलं व्हॅलेँटाईन कुणीही असू शकतं! ज्यांना आपण कधी आपलं प्रेम व्यक्त केलं नाही त्यांच्याप्रती आपलं प्रेम व्यक्त करून मन मोकळं करण्याचा, आपल्याप्रती त्यांच्याकडून पवित्र प्रेमाची मागणी (Propose) करण्याचा हा दिवस... मग प्रत्युत्तरात होकारच अपेक्षिणे आवश्यक नाही. ज्या गोष्टीसाठी कधी वेळ काढला नाही अशांसाठी सवडीने फक्त प्रेम व्यक्त करण्यासाठी हा स्वतंत्र दिवस...
मग मला कळत नाही कि पाश्चिमात्य म्हणून बोट दाखवून नेमक्या याच दिवसाला विरोध का? विरोधास एक सुयोग्य कारण अवश्य आहे तो म्हणजे 'व्हॅलेँटाईन डे' च्या नावाखाली मिळालेल्या स्वातंत्र्याची चाकोरी झुगारून सर्रास असभ्यपणे अश्लील चाळे करत भर रस्त्यांवर तरूण-तरूणींचे भ्रमण करणे... ही बाब सोडल्यास मला तरी व्हॅलेँटाईन डे ला विरोध करण्याचे कारण वाटत नाही व वरील प्रकार थांबल्यास या दिवसाला विरोध करण्याची गरज भासणार नाही...
असो...! शेवटी जर कूणा हौश्या-नवश्या प्रेमवेड्यांना माझे शब्द टोचले असतील तर क्षमस्व...! पवित्र प्रेमाच्या जाणकार व अनुकर्त्यांना शब्द रुतण्याचा प्रश्नच नाही..
.
अंतिमत: एकच संदेश द्यावासा वाटतो- चला शांतीपूर्ण मार्गाने सभ्यपणे सर्वाँशी प्रेमाने राहून पवित्र प्रेमाचा संत व्हॅलेँटाईनचा प्रेमसंदेश संपुर्ण जगापर्यँत पोहचवूया...
प्रेम! "पवित्र अडीच अक्षरांचा संगम म्हणजे प्रेम." पण आज प्रेम शब्द कानावर येताच अथवा ओठांतून निघताच नयनचक्षूंसमोर भ्रमण करतात दोन परलिँगी पाखरू---> तरुण-तरुणी आणि अल्पवयीन मुले-मूलीही...! आज प्रेम हा पवित्र शब्द अपवित्रच होताना जास्त दिसत आहे आणि रोजच्या वर्तमानपत्र व वृत्तवाहिन्यांवरील प्रेमविषयक गुन्हेगारीवरून सिद्धही!
"प्रेम हा खरं तर सृष्टीचक्राच्या नियंत्रणाचा एकमेव आधार. प्रेमाविना क्षणभराचा मोकळा श्वासही शक्य नाही." मला माझे मित्र प्रेमविरोधी म्हणूनही ओळखत असतील... पण माझं प्रेमविरोधी बनण्यामागचं कारण व पार्श्वभूमीही तशीच आहे. आणि खरं म्हणजे मी प्रेमविरोधी नाहीच. माझा 'प्रेम' या शब्दाला विरोध नाहीच मुळी..! पवित्र प्रेमाला तो ईश्वरही विरोध करत नाही तेव्हा मी कोण तो विरोध करणार? मी विरोध करतो आजच्या तरुण-तरुणीँच्या अविचारी प्रेमाला.
मला विचारावसं वाटतं कि काय प्रेम हे फक्त प्रियकर-प्रेयसीचच असतं? तर नाही. प्रेम म्हटले म्हणजे आई-बाळांचे, पक्षी-पिल्ल्यांचे, गाय-वासरूचे, मित्र-मैत्रिणीँचे, प्रियकर-प्रेयसीचे व भाऊ-बहिणीचे सुद्धा असते. माझा विरोध प्रियकर-प्रेयसीच्या पवित्र प्रेमालाही नाही पण अशा पवित्र प्रेम करणाऱ्या जोडप्यांची शेकडेवारी काढल्यास हातापायाची 20 बोटेही जास्त ठरावीत! आणि हिच बाब चिँताजनक आहे.
आज प्रेम हा शब्द काळजी व भावनिकतेचा राहिलेला नसून फक्त शरीरसुखासाठी उपभोगाचा बनून उरलेला आहे. प्रत्येक जण प्रेमाचा स्वत:च्या ईच्छेनुसार वापर करू लागला आहे... बदलत्या काळानुसार प्रेमाच्या व्याख्याही आता बदललेल्या आहेत. "आजची पिढी प्रेम या संज्ञेच्या नावाखाली वासनेच्या आहारी फरफडत चालली आहे." सदर लेखातून माझा उद्देश प्रियकर, प्रेयसी, प्रेम वा व्हॅलेँटाईन डे चा विरोध करण्याचा मुळीच नाही; परंतु आजचे अवसे-नवसे-गवसे-हौसे प्रेमवेडे माझ्यापुढे लैला-मजनू, हिर-रांझा, सलीम-अनारकली, देवदास-पारो व रोमिओ अॅँड ज्युलिएट यांच्या इतिहासजमा पवित्र प्रेमाची उदाहरणे देतील मी जाणतो परंतु ते प्रेम आता शिल्लक राहिलेले नाही व भविष्यात पुनरावृत्ती होणेही शक्य नाही. कारण तशी सहनशीलता आजच्या युवकांमध्ये उरलेली नाही. आणि ज्यांनी प्रेमाचे निर्मळ नीराप्रमाणे पावित्र्य जपलेले आहे त्यांना माझ्या विचारांचा विरोध करण्याचा वा आक्षेप घेण्याचे कारण नाही; उलट त्यांना सदर लेखातील सत्यता व वास्तविकता कळेलच.
आज प्रियकर + प्रेयसी = प्रेम (LOVE) = वासना (Lust) आणि या वासनायुक्त प्रेमातूनच पुढे घडतात शरीरसंबंध (Physical Relations / SEX) आणि यास जर नकार पुढे आला अथवा नंतर 'दगा' दिला तर मग--- 'बला***' (R***) आणि हत्या..! आणि इतकं सगळं होत असताना जर मग लोक LOVE=SEX हे समिकरण तयार करत असतील तर त्यांचं तरी कूठे चूकतय? आज बहूतांश (मोजके अपवाद सोडून) प्रियकर-प्रेयसींनीच हे समिकरण तयार करण्यास भाग पाडलंय व हे समिकरण सिद्धही केलय..!
हे झाले आजच्या प्रेमविषयक माझे विचार... असो...!
आज 14 फेब्रुवारी म्हणजे 'व्हॅलेँटाईन डे'. माझा विरोध हा दिवस साजरा करण्यास नाहीच मुळी..! 14 फेब्रुवारी हा रोम आणि तर्नी या दोन देशात प्रेमाचा संदेश देणा-या 'व्हॅलेँटाईन' नावाच्या दोन भिन्न संताचा भिन्न काळातील शहीददिवस. जो जगभर त्यांच्याच नावाने त्यांचाच प्रेमाचा संदेश देऊन (प्रेम व्यक्त करून) पाळला जातो. आजच्या दिवशी आपण कुणासही 'व्हॅलेँटाईन' दिनाच्या शुभेच्छा देऊ शकतो. अगदी आई-बाबा, मित्र-मैत्रिणी, भाऊ-बहिण, विद्यार्थी-शिक्षक, सहकर्मचारी, शेजारी आणि प्रियकर-प्रेयसी तर आहेतच..! कुणी म्हणजे कूणीही! असा प्रत्येक जण ज्यांच्यावर आपण प्रेम करतो. होय..! आपलं व्हॅलेँटाईन कुणीही असू शकतं! ज्यांना आपण कधी आपलं प्रेम व्यक्त केलं नाही त्यांच्याप्रती आपलं प्रेम व्यक्त करून मन मोकळं करण्याचा, आपल्याप्रती त्यांच्याकडून पवित्र प्रेमाची मागणी (Propose) करण्याचा हा दिवस... मग प्रत्युत्तरात होकारच अपेक्षिणे आवश्यक नाही. ज्या गोष्टीसाठी कधी वेळ काढला नाही अशांसाठी सवडीने फक्त प्रेम व्यक्त करण्यासाठी हा स्वतंत्र दिवस...
असो...! शेवटी जर कूणा हौश्या-नवश्या प्रेमवेड्यांना माझे शब्द टोचले असतील तर क्षमस्व...! पवित्र प्रेमाच्या जाणकार व अनुकर्त्यांना शब्द रुतण्याचा प्रश्नच नाही..
.
अंतिमत: एकच संदेश द्यावासा वाटतो- चला शांतीपूर्ण मार्गाने सभ्यपणे सर्वाँशी प्रेमाने राहून पवित्र प्रेमाचा संत व्हॅलेँटाईनचा प्रेमसंदेश संपुर्ण जगापर्यँत पोहचवूया...
HAPPY VALENTINE's DAY..!
- लेखक: राजेश डी. हजारे (आरडीएच)
- आमगाव जि. गोंदिया
- प्रथम प्रसिद्धी: १५ फेब्रूवारी २०१३
- अज्ञयावत व पुनःप्रसिद्धी: १४ फेब्रूवारी २०१७ व २०१८
- © सदर लेखाचे सर्वाधिकार लेखकाकडे राखीव असून लेखकाच्या लिखित परवानगीशिवाय सदर लेख जसाचा तसा, आंशिक बदल करून अथवा निनावी कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही.
- (या लेखाचे लेखक अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद चे गोंदिया जिल्हा जिल्हाध्यक्ष आहेत.)
राजेशजी आपण आपल्या लेखातुन प्रेमाचे वास्तव समीकरण मांडले आहे.... आजचे तरुण तसेच तरुणीही प्रेम म्हणजे केवळ काही दिवसांसाठी आनंद अथवा बागडणे या गोष्टीकडे जास्त लक्ष देतात.... या सर्वामध्ये भावनेला आळा बसला आहे.... आज प्रत्येकाला आपलं प्रेम(प्रियकर अथवा प्रेयसी ) हवी/हवा असते/असतो.... परंतु त्या काही काळाच्या प्रेमापोटी त्यात सामावुन भावना खुप स्वार्थी बनत जात आहेत.. त्यामध्ये क्वचितच एकमेकांचा आदराने विचार केला जातोय..... हरवतेय तो नाजुक प्रेमाचा अर्थ......
ReplyDeleteमला या प्रतिक्रियेतुन कोणाच्याच भावना दुखवायच्या नाहीत..... मी केवळ माझे मत थोडक्यात मांडतेय.... तसं पाहीलं तर विखुरलेल प्रेम..... समाजात किती रुजलं आहे हे आपण सर्व पाहतच आहेत..... काही अविचारी तरुण तर प्रेम म्हणजे आनंद उपभोगणे या एकांकी दृष्टीकोनातुन तरुणींना भुरळ पाडतात.... याचा अर्थ सर्व दोष तरुणांचा नाही.... तरुणी ही यात सहभागी आहेत.....
धन्यवाद......
राजेशजी आपला लेख अप्रतीमच आहे.... त्यात काडीमात्र शंका नाही...
Waah.... hila mhantat pratikriya... asha pratikriya aalya ki lekh lihinyache sarwa prayatna sarthak zalyasarkhe waattaat
Delete.. kharach khoop khoop Dhanyawad Komal ji..
������������������������