Thursday 8 November 2012

Blog 15- फरक-भारत व अमेरिकेच्या राजकारणातला...!

नुकतीच अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली... भरपूर मतप्रचारानंतर व लक्षवेधी चढाओढीनंतर अमेरिका राष्ट्रध्यक्ष निवडणूकीवर अवघ्या जगाचे लक्ष लागले असताना निवडणूकीचा निकाल लागला-- डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार व अमेरिकेचे विद्यमान राष्ट्रपती Barack Obama यांनी 303 मते घेत 206 मते घेणा-या रिपब्लीकन पक्षाचे उमेदवार Mitt Romney यांचा 97 मतांनी दणदणीत पराभव केला... आणि यासोबतच सलग 2 वेळा अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष निवडणूक जिँकणा-या Hillary Clinton, George Bush या दोन माजी राष्ट्राध्यक्षांच्या पंक्तीत अमेरीकन जनतेने Barack Obamaयांनाही बसवले.
...
या निवडणूकीनंतर एक बाब माझ्या निदर्शनास आली ती म्हणजे अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूकीत विजयानंतर Barack Obama यांचे Mitt Romney यांनी हस्तांदोलन करत व आलिँगन देत अभिनंदन केले व रोम्नी यांनी ओबामांना शुभेच्छा दिल्या; शिवाय कामकाजात रोम्नीँची मदत घेणार असल्याचे बोलून ओबामांनीही मनाचा मोठेपणा दाखवला...
...
अमेरिकेत घडत असलेला हा विलक्षण क्षण पाहून माझं मन थोडं भूतकाळात डोकावलं आणि अमेरिकेच्या निवडणूकीची काही महिन्यांपूर्वीच भारतात झालेल्या राष्ट्रपती निवडणूकीशी तुलना केली असता माझा मलाच प्रश्न पडला कि- आम्ही जागतीक महासत्ता होण्याचे स्वप्न पाहणारे भारतवासी! पण आमच्या देशात काय चाललंय?
...
बहूपक्षांच्या समर्थनाने निवडून येणारे सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मा.श्री प्रणव मुखर्जी राष्ट्रपती म्हणून निवडून येतात व मोजक्या पक्षांच्या समर्थनाने रिँगणात उभे होत निश्चित पराभवाची कल्पना असून देखील चमत्काराची आशा बाळगणारे आणि शेवटी भरपूर मतांनी पराभूत होणारे मुख्यत्वे भाजपा समर्थित उमेदवार मा.श्री पी.ए.संगम्मा स्वत:चा पराभव स्विकारल्यानंतरही देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान महामहिम राष्ट्रपतीविरोधात सर्वोच्च न्यायालयात खटला टाकतात... यावरून काय अर्थ काढावे मला तरी उमगत नाही...
...
जर निवडणूकीत काही गैरप्रकार घडला! तर निकालापूर्वीच हा मुद्दा उठवावयास हवा होता... मला इथे एकच प्रश्न पडतो कि जी शंका मा.श्री संगम्मा व्यक्त करताहेत ती सत्य असो वा नसो, कारण मला निश्चित माहिती नसल्याने यासंदर्भी स्वत:चे मत व्यक्त करणे टाळणेच मी पसंत करीन; परंतु जर का तो गैरप्रकार घडल्याची शंका असूनदेखील समजा राष्ट्रपती निवडणूकीचा निकाल वेगळा लागला असता आणि जर का मा.श्री पी.ए.संगम्मा विजयी झाले असते तर काय त्यांनी मा.श्री मुखर्जी यांच्याविरोधात खटला चालवण्याची मागणी केली असती? कदाचित नाहीच..! आणि जर नाही... तर असे उमेदवार जे देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवत असतील ज्यांना स्वत:च्या विजयानंतर विरोधी उमेदवारांनी केलेला भ्रष्टाचारही चालतो, मात्र स्वत:च्या पराभवानंतर निवडणूकीत प्रचंड फरकाने विजेत्या व राष्ट्रपती या सर्वोच्च पद व मानाच्या व्यक्तीची... अहो व्यक्तीची जाऊ द्या... पण राष्ट्रपती या सर्वोच्च पदाची सुद्धा गरीमा लक्षात घेत नसतील, अशा उमेदवारांना त्या सर्वोच्च राष्ट्रपतीपदाची स्वप्ने पाहणेही एकीकडे जागतीक महासत्ता होऊ पाहणा-या देशाच्या भविष्यकालीन राजकीय वाटचालीच्या दृष्टीने चिँताजनक नाही का? आणि जर का भारताचा राजकीय इतिहास असाच चालत राहिला तर... सर्वाधिक तरुणांच्या व जगात दुस-या क्रमांकाच्या सर्वाधिक लोकसंख्येच्या भारत देशाला 2020-25 पर्यँत 'जगातील आर्थिक महासत्ता' म्हणून समोर आलेल्या पाहण्याचे भारताचे माजी महामहिम राष्ट्रपती 'भारतरत्न' Dr.A.P.J.Abdul Kalam यांनी पाहिलेले स्वप्न हे स्वप्नच राहून जाऊ नये...
...
साध्या ग्रामपंचायत निवडणूकीत जरासे काही घडले की मोठ-मोठे लेख छापून येतात पण भारताच्या सर्वोच्च पदासंदर्भात अशी घटना घडली तरी कूणाच्याही लेखनीतून हा विषय मांडला न गेल्याने मलाच आश्चर्य वाटले... इतरांप्रमाणेच "लिहितील न दिग्गज मंडळी... आपल्याला काय आवश्यकता..." या विचारात प्रतीक्षा करूनही आजवर कुणाच्याही लिखाणात सदर विषय आढळला नाही... आणि आता अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूकितील विजेत्या व पराभूत उमेदवारांनी संपूर्ण जगासमोर घालून दिलेल्या उदाहरणानंतर मीच भारतात राष्ट्रपती या सर्वोच्च पदासंबंधी घडलेल्या सदर विषयावर लिहिण्याचं धाडस केलं...
...
मी कुण्या पक्षाचा समर्थक वा विरोधक नाही वा कुण्या वृत्तपत्राचा संपादक वा पत्रकारही नाही; ना मी कूणी खुप मोठा सामाजिक कार्यकर्ता आहे... खरं सांगायचं तर मी एक भारताचा तरूण नागरीक आहे. कदाचित माझे विचार कित्येकांना पटणार नाहीत पण माझ्या तरूण वाचक मित्रांना काय सत्य व योग्य आहे ते पटेल आणि आजच्या तरूण लेखकांची लेखनीच एक दिवस क्रांती घडवून आणेल यात शंका नाही.
...
सरतेशेवटी यानंतर तरी सध्याच्या एकमेव 'जागतिक महासत्ता' असलेल्या अमेरीकेच्या राज्यकर्त्याँकडून भारताचे राजकीय नेते काहीतरी सकारात्मक धडा घेत भारताला 'जगातील आर्थिक महासत्ता' म्हणून निर्माण करण्याच्या दृष्टीने यशोशिखरावर नेण्यासाठी राजकिय फायद्याचा विचार न करता आवश्यक ते यथोचित राजकीय पाऊल उचलून भारताला विकासाच्या दिशेने नेत रहावे की जेणेकरून अवघ्या जगाचे भारत नेत्र दिपून घेईल...
...
RDH (Rajesh D. Hajare)
•गोँदिया जिल्हाध्यक्ष
•अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे
-08th Nov.2012
-Amgaon

1 comment:

  1. Super inforatmive writing; keep it up.

    ReplyDelete

Thank you so much for your comment on BookLysis by RDHSir.com! To avoid spam, your comment has been forwarded to the author for moderation purpose. If found all right, your comment will be approved soon!
Thank you so much!

Keep commenting..!

Don't forget to CHECK in NOTIFY ME.

Regards,

Rajesh D. Hajare (RDHSir)
Founder, BookLysis by RDHSir.com
www.rdhsir.com