आयुष्याच्या 17 वर्षानंतर मला एक 'ताई' मिळाली. पण एका गैरसमजामुळे की काय! ती मला भाऊ माणण्यास तयार नाही; त्या ताईच्याच विचारात आजही सारा दिवस जातो आणि डोळ्यातून अश्रू ओसंबळून वाहतात. ताई माझ्याशी बोलत नसल्यामुळे मला खुप दु:ख होते जे मी आजपर्यँत आपल्या पोटात पचवले आहेत.
मला झालेले दु:ख बाहेर काढून आपल्या भावना जगासमोर प्रकट करण्यासाठी मी मानलेल्या माझ्या एकमेव ताईचं वर्णन प्रस्तूत "माझी ताई : एक आठवण" या माझ्या जीवनातील प्रथमच कादंबरीत केलं आहे; परंतु या कादंबरीतील सर्व घटना/प्रसंग माझ्या जीवनातील सत्य घटना/प्रसंग असल्यामुळे "माझी ताई : एक आठवण" ही कादंबरी नसून माझे 'आत्मकथन' आहे.
प्रस्तूत कथन करण्यापूर्वी माझा डी.टी.एड. चाच मात्र आता पोलिस बनलेला गडचिरोलीचा मित्र 'विजय शंकर चिँतुरी' च्या 'प्रेमाचे श्मशान'या अप्रकाशित कादंबरीच्या वाचनाचा व त्याच्या सल्ल्यांची मला "माझी ताई : एक आठवण" ही पुस्तकस्वरूपात कथन करताना खुप मदत मिळाल्याने मी त्याचा ऋणी आहे
तसेच मला ही कादंबरी लिहिताना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मदत करणारी माझी एकमेव मैत्रीण 'कु. दिपाली घरजाळे' चे देखील आभार मानणे मी आपले कर्तव्य समजतो; पण या 2 व्यक्तीँचे ऋण व्यक्त करून फेडण्याचा प्रयत्न केल्यास तो माझा स्वार्थीपणा ठरेल आणि मी ते पांग फेडू शकण्याइतपत स्वत:ला सामर्थ्यशील समजत नसल्यामुळे या दोघांच्या ऋणातच राहणे मी पसंत करेन.
"माझी ताई : एक आठवण" या आत्मकथनात अचुक व यथातत्पर दाखले देण्यासाठी मी पुस्तकाच्या शेवटी नमूद सर्व साहित्यांचं वाचन केलं असलं तरी चुकिची अथवा अतीशयोक्तीपूर्ण वा खोटी माहीती देण्यात आलेली नाही हे मी ठामपणे सांगू ईच्छितो... तरीदेखील सदर पुस्तकातील काही मते माझी व्यक्तीगत असू शकतात आणि मी त्यांचे समर्थनच करेन.
वाचक मित्रहो मी प्रेमविरोधी नाही. परंतु सदर पुस्तकातील माझी प्रेमाविषयीची प्रेमविरोधी मते वाचून आजची प्रेमाच्या नावाखाली निव्वळ चव्हाटेगिरी करणारी काही युवा मंडळी माझा विरोधच करतील आणि हे जाणत असूनदेखील मी स्वत:च्या वक्तव्यांवर आयुष्यभर ठाम राहणेच पसंत करीन कारण त्याची मला आता सवयच जडलीय; तसेच माझ्या वक्तव्यांचा विरोध करणा-या ढोँगी प्रेमी युगलांइतके जरी नसले तरी नि:स्वार्थी पवित्र प्रेमाचे पुरस्कर्ते ही या विश्वात कमी नाहित ज्यांचा विरोध मीच काय? तर तो 'ईश्वर' देखील करणार नाही. आणि माझ्या वक्तव्यातील सत्यता या पवित्र प्रेमीँना उमगली तरी माझ्यासाठी पुरे आहे.
वाचक मित्रजणहो, माझा उद्देश या पुस्तकाद्वारे माझी ताई, माझे वा तीचे मित्र-मैत्रिणी, आपल्या भावना दुखावण्याचा ना कधी होता ना राहील परंतु "माझी ताई : एक आठवण" चे लेखन मी भावनेच्या ओघात केले असल्यामुळे माझ्याही लेखनीतून आपल्या भावना दुखावणारे कित्येक शब्द लिहीले गेले असतील कारण अशी एक म्हण आहे की- "चुका करणे हा मानवाचा जन्मजात स्वभावच आहे." ती मी स्विकारून तो माझा अजाणतेपणा समजून आपणास घडलेल्या चुकीबद्दल नतमस्तक होत क्षमा मागतो; व आशा करतो की या नवोदित लेखकाला माफ करून पुस्तकातील माझी चुक लक्षात आणून द्याल जेणेकरून आपल्या सुचना पटल्यास मी चुकातून शिकून धडा घेत या पुस्तकाला सर्वसामान्य भाऊ-बहिणीच्या हृदयापर्यँत पोहचवू शकेन कारण मी असे मानतो की- "झालेल्या चुका स्विकारून त्यांची पुनरावृत्ती न करणे हा यशस्वी जीवनाचा मूलमंत्र आहे."
मित्रहो,
-RDH (राजेश डी. हजारे)
- मुळ लेख: ज्येष्ठ शुक्ल 3 शके 1932बुधवार दि. 23 जून 2010रामटेक, जि. नागपूर
- निजभाद्रपद शुक्ल 14 शके 1934शनिवार दि. 29 सप्टेँबर 2012आमगाव, जि. गोँदिया
- निजभाद्रपद शुक्ल 14 शके 1934
Mazi Tai.
ReplyDeletekharch aaj abhinandan karaveshe vatate te Facebook che.
ya madhematun aaj amhi sarve friends aplyashi,ekmekashi sanvat sadhu shakto.
RDH tumchi Kadambari nasun karya jeevnatil natyanchi khari bandhani ahe.
so very nice..